Avinash Kajale
थोडासा थांब
बघ तर मागे वळून
कुठपर्यंत आलेय मी
तुझ्या सोबत तुझ्या नकळत
थोडासा थांब
बघ तर जरा हे डोळे तुझीच वाट बघत आहेत रात्रं दिवस
थकलेत रे ते..
त्याना अलगद एकदा तुझ्या ओठानी पुसून तर जा जरा
थोडासा थांब
तुझ्या नसन्याणे तुझ्या असण्याचे महत्व कळले आहे मला
तुझ असण पुन्हा एकदा देऊन तर जा जरा
थोडासा थांब
तुझ काम, तुझ घर, तुझे मित्र, तुझ विश्व
सगळ सगळ मान्य मला
पण इथे कुणीतरी तुझ्यासाठी एक जग उभ केलय
ते बघून तर जा जरा
थोडासा थांब
ह्या चांदण्या सुद्धा हसतात रे मला
म्हणतात ज्याला तू आमच्यात शोधत असतेस रात्र रात्र
तो ही तुझ्यासाठी झुरतोय का असाच?
त्या चांदण्याना उत्तर देऊन तर जा जरा
थोडासा थांब
आठवण तुलाही येते माझी
पापणी तुझीही ओलावते अश्रुनी
त्या तुझ्या अश्रुना माझ्या ओन्जळीत घेऊ तर दे जरा
थोडासा थांब
तुझ बोलण तुझ हसण तुझा राग तुझ गप्प राहण
घेउन गेलास तुझ्याबरोबर तू सर्व
जगण्यासाठी तेवढच आहे रे माझ्याकडे
माझ जगण मला परत देऊन तर जा जरा
थोडासा थांब
प्रेमात म्हणे न सांगता न बोलता सगळ कळत
मग न सांगता न बोलता
मला समजुन तर घे जरा
थोडासा थांब
माझ्या जवळ थोडासा बस तर जरा
माझा श्वास, माझी सोबत, माझा सहवास
अनुभव तर जरा
थोडासा थांब
माझ्या दिवसात, माझ्या रात्रीत
माझ्या प्रत्येक क्षणात तू आहेस
व्यापून टाकल आहेस तू मला
माझा एक एक क्षण
मला परत देऊन तर जा जरा
थोडासा थांब
तुझ्यात स्वत:लाच कुठेतरी
हरवून बसले आहे मी
जरा येऊन ...माझी मला शोधून तर दे जरा
थोडासा थांब
एकदा, फक्त एकदाच माझ्या मनात डोकवून तर जा
स्वता:लाच बघितल्यावर कस वाटत
ते सांगून तर जा जरा...
थोडासा थांब
अळुवावरच्या थेंबासारखा आहे रे हे आयुष्य... क्षणभंगुर
कुणी ते पान हलवण्या आधी आणि
तो इवलसा थेंब कुठेतरी लुप्ट होण्याआधी
एकदा प्रेम करुन तर जा जरा...
थोडासा थांब
शेवटचा थोडासा थांब
कसलीही अपेक्षा नाही... की कसलेही बंध नकोत
प्रेम केल आहे तुझ्यावर... त्यात कसले व्यवहार नकोत
भावनाच फक्त कळतात रे मला
त्यांच्या पलीकडच काहीही नको
एकदा त्या भावनाना स्पर्शून तर जा जरा
थोडासा थांब
ह्या वेडीला थोडस शहाणपण शिकवून तर जा जरा...
थोडासा थांब